Founder Message

Founder Message

आमच्या सैनिकी शाळा पद्धतीने चालणाऱ्या माध्यमिक शाळा जिचा विस्तार ज्युनिअर के.जी ते ज्युनिअर कॉलेज पर्यंत झाला आहे. ज्युनिअर के.जी. सिनियर के. जी. तसेच इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा आणि अकरावी बारावीच्या परीक्षेचे निकाल अभिमानास्पद आहेतच, परंतु मुलांना केवळ पुस्तकी किडे न बनवता पुस्तकी ज्ञानाबरोबर शारीरिक शिक्षणातही आमच्या विद्यार्थ्यांना शाळेचा लौकिक देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर सातासमुद्रापार जाऊन वाढविला हे सांगताना मन अभिमानाने भरून येते आमची ही मुले खेड्यापाड्यात राहणारे विशेषतः शेतकरी कुटुंबातील आहेत. याचा गैरफायदा न घेता त्यांना उत्तमोत्तम शिक्षणाबरोबरच इतर सुविधा ही दिल्या जातात. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून आम्हा पैकी कोणाला स्वतःसाठी पैसा मिळवण्याचे अभिलाषा न ठेवल्यामुळे इतरापेक्षा कमीत कमी फी मध्ये अधिकाधिक चांगले कसे करता येईल ते आम्ही करत आहोत. आमचा स्टाफ ही याला अतिशय चांगली साथ देत आहे ही गौरवाची बाब निश्चितच आहे शिकणाऱ्या मुलापासून ते शिकवणारे शिक्षक व व्यवस्थापन पाहणाऱ्या प्राचार्य पासून ते शिपायापर्यंत सर्वांना धन्यवाद...


मा .श्री. अण्णासाहेब डांगे

(संस्थापक अध्यक्ष )

पालक बंधू भगिनींनो,
आपला पाल्य (मुलगा) उच्चविद्याविभुषीत होऊन या देशाचा आधारस्तंभ व्हावा. बहुरंगी व विविधतेने नटलेल्या समाजाचा कणा व्हावा असे कोणा पालकांना वाटणार नाही ? सर्वांनाच असे वाटत असते. परंतु ' दात आहेत तिथे चणे नाहीत व चणे आहेत तिथे दात नाहीत ' अशा काही घुसमटलेल्या स्तिथीत अनेकजण सापडले आहेत. अश्या परिस्थितीत असलेल्याच्या मदतीस आजवर अनेक संस्था, व्यक्ति पुढे आल्या असून आपापल्या परीने उत्तम काम करीत आहेत. असे असले तरी गरज संपलेली नाही. याशिवाय प्रत्येकजण आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमची इस्लामपूरची 'संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था ' देखील सन १९८६ पासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. इवलासा लाविलेला वेलू गगनाच्या दिशेने चालला आहे.
आमचे लक्ष- राष्ट्रीय मान्यतेची संस्था म्हणून प्रस्थापित होणे.
आमचा ध्येयपथ - आम्ही अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल, आष्टा या विद्यालयातील समस्त घटक आमच्या पब्लिक स्कूलमधील शिक्षण व सेवा निष्ठापूर्वक पुरवून आमचे लक्ष प्राप्त करण्यासाठी कृतसंकल्प आहॊत.
आमचे गुणवत्ताधोरण - आमच्या पब्लिक स्कूलच्या गुणवत्तेत निरंतर सुधार करण्यासाठी आम्ही खालील गोष्टी आचरणात आणू.

1)नियमबद्ध व रचनाबद्ध पद्धतीचे काटेकोरपणे पालन.
2)औपचारिक व अनौपचारिक कर्तव्य व जबाबदारीची जाणीव.
3)दिलेल्या जबाबदारीच्या संदर्भात विविध प्रकारच्या नवंनवीन युक्त्या व उपाययोजना करीत राहणे.


मा .अ‍ॅड. राजेंद्र उर्फ चिमणभाऊ डांगे

(सचिव)