आण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूल हे आजच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रातील राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचा अभ्यासक्रम अंगीकृत असणारी कायम
विनाअनुदानित माध्यमिक स्तरातील पहिली आय. एस. ओ. -९००१:२०१५ ने मानांकित शाळा झाली आहे. आय. एस. ओ. मानांकनासाठी भौतिक सुविधा व त्याच बरोबर
शैक्षणिक गुणवत्ता विद्याथ्यांच्या कलागुणांना वाव देणारे शालेय व सह शालेय उपक्रम व कौशल्याची व्यासपीठ निर्माण करणारे केंद्र म्हणून हे विद्यालय नावारूपास आले आहे.
आज आमच्या विद्यालयाकडे सुसज्ज भव्य इमारत, प्रशस्त वर्ग खोल्या, इ-लर्निंग ची सोय, उत्कृष्ट संगणक पक्ष, सैनिकी पॅटर्नचे प्रशिक्षण,
त्याचबरोबर आधुनिक जगात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या-त्या पूरविण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आमचे
विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आमच्या संस्थेचा व शाळेचा नावलौकिक वाढवित आहेत.विविध क्रीडा प्रकारामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलेले असून ६७ विद्यार्थी राष्ट्रीय व राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी झाले आहेत.
१० वी बोर्ड परीक्षा २०१९ मध्ये २२ विद्यार्थ्यांनी क्रीडाचे ग्रेस गुण मिळवले आहेत तर ५ विद्यार्थी "खेलो इंडिया " या स्पर्धेत सहभागी झाले
आहेत.
"गुणवत्तेची अट नाही, गुणवत्ता आह्मी निर्माण करू " या ध्येयानुसार आमची वाटचाल सुरु आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती बरोबरच
त्यांच्या शारीरिक जडणघडणीसाठी विविध प्रकारचे सांघिक व वैयक्तिक खेळ यासाठी आवश्यक
असणारे तज्ञ राष्ट्रीय खेळाडू यांची प्रशिक्षक म्हणून संस्थेने नेमणूक केली आहे.
त्याचबरोबर आवश्यक असणारे प्रशस्त मैदान, त्यावरील सोयी सुविधा यांची उपलब्धता मुबलक प्रमाणात करून दिली आहे.
अजूनही आम्हाला भरपूर यशोशिखरे गाठायची आहेत. त्या दृष्टीने भविष्याच्या वाटचालीसाठी आय. एस. ओ. मानांकन हा मोलाचा दगड ठरणार आहे.
सर्व बाबीसाठी माझ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी विदयार्थी-विद्यार्थिनी यांनी अहोरात्र कष्ट घेतले. त्याचबरोबर तुम्हा सर्व पालकांच्या विश्वासावरच आम्ही
इथपर्यंत मजल मारु शकलो त्याबद्दल आपले मनस्वी आभार...